ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही...

चंद्राग्रहण हे सूर्य- पृथ्वी- चंद्र हे एका रेषेत आल्याने होत. हे आपण प्राथमिक शाळेत शिकतो.  पृथ्वीच्या छायेत पूर्णपणे चंद्र  आल्यावर खग्रास चंद्रग्रहण तर काही भाग आल्यास खंडग्रास चद्रंग्रहण होते. मात्र चंद्रग्रहणात चंद्राकडे पाहु नये . कारण अशुभ किरणे किवा घातक किरणे पडतात, असे मानलं जातं. काही पदार्थात तुळशीचे पान टाकुन त्यांना स्वतःच ' शुध्द ' झाल्याच समजल्या जातं तर पाणी अशुद्ध झालं म्हणून फेकून दिल्या जातं.   जनता कायम अज्ञानात , अंधश्रद्धेत , मुहूर्त आणि
 ग्रहगोलांच्या भिंतीत राहून ती
 लुबाडता यावी, हेच षडयंत्र त्यामागे आहे. कुठलेच अशुद्ध आणि घातक किरण चंद्रग्रहणाच्या काळात पृथ्वीवर पडत नाही, हे खगोलशास्त्रज्ञांनी अनेकदा सिद्ध केल आहे. उलट , आम्ही वीस कुडल्या देतो. त्या आधारे त्या वीस व्यक्तींचे अचूक भविष्य सांगून  'फलजोतिष' हे शास्त्र असेल तर ते सिद्ध करा, 25 लाख रुपये मिळवा.  म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने वेळोवेळी दिलेली  जाहीर आव्हान फलज्योतिष्यांनी (कुंडली च्या आधारे भविष्य व शुभ-अशुभ मुहूर्त सांगणार्यांनी) कधीच न स्वीकारता पळ काढला आहे . ही वस्तुस्थिती आहे.
खरच अशी किरण पडतात का ? जरा तुम्हीच तपासा.  मित्रांनो,  पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा स्वयम प्रकाशित नाही. सूर्यमालिकेतील कुठलाच ग्रह स्वयम प्रकाशित नाही.   त्यांच्यावर सूर्याचा प्रकाश पडतो व तो पृथ्वीवर परावर्तित होऊन आपणा पर्यंत पोचतो.  म्हणजे त्यांच्याकडून कुठलीच किरणे आपणा पर्यंत पोहचत नाही.  उलट ग्रहण काळात चंद्र पृथ्वीच्या छायेत जातो. त्यामुळे त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारे किरण पडणे शक्यच नाही. जोकाही प्रकाश आहे तो सूर्याचाच आहे.  त्यातही  एकादशी - चतुर्थी - सप्तमी- अष्टमी (उदा.) हे काही विशेष दिवस नाहीत तर चंद्राच्या कलांवरून आपल्या पूर्वजांनी  तयार केलेली कालगणनेची पद्धती आहे. हे सुद्धा या निमित्ताने समजून घ्या.  
   ग्रहण काळात आम्ही अनेकदा जेवलो त्याचा काहीही परिणाम आमच्यावर झाला नाही. ही अवकाशात घडणारी खगोलिय घटना आहे. चला तर , चंद्रग्रहण पाहा आणि खगोलिय घटनेचे निरिक्षण करून आनंद घ्या आणि मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडा व इतरांनाही प्रेरीत करा.

Click to View

aaaa